IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ 2024) सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 113 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
पुण्यात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत भारतात पहिल्यादा कसोटी मालिका जिंकली आहे. भारताला पुणे कसोटी जिंकण्यासाठी 359 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने दिले होते मात्र भारताचा दुसरा डाव 60.2 षटकांत 245 धावांवर आटोपला पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला होता.
तर दुसरीकडे या पराभवानंतर भारताने 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. 2012 मध्ये इंग्लंडकडून कसोटी मालिकेत घरच्या मैंदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी इंग्लंडने चार सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. या सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वी 1 गडी बाद 81 धावा केल्या होत्या. उपाहारानंतर संघाने 86 धावांत 6 विकेट गमावल्या. शुभमन गिल 23 धावा करून बाद झाला.
यशस्वी जैस्वाल 77 धावा करून बाद झाली. विराट कोहलीने 17 धावा केल्या. ऋषभ पंत खाते न उघडताच धावबाद झाला. सर्फराज खान 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉशिंग्टन सुंदर 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. उपाहारापूर्वी रोहित शर्मा 8 धावा करून बाद झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडकडून सँटनरने 13 विकेट घेतल्या.
A tough loss for #TeamIndia in Pune.
Scorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PlU9iJpGih
— BCCI (@BCCI) October 26, 2024
भारतातील कसोटी मालिका जिंकणारे संघ
इंग्लंड (पाच वेळा, शेवटचे 2012/13)
वेस्ट इंडिज (पाच वेळा, शेवटचे 1983/84)
ऑस्ट्रेलिया (चार वेळा, शेवटचे 2004/05)
पाकिस्तान (1986/87)
दक्षिण आफ्रिका (1999)
मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, गोपीचंद पडळकर रिंगणात
न्यूझीलंड (2024/25)