IND vs NZ : भारतीय संघाला मोठा धक्का, ऋषभ पंत न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर; कारण काय?

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून (11 जानेवारी) 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत असून या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच

IND Vs NZ

IND Vs NZ

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून (11 जानेवारी) 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत असून या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमूळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाल्याने तो या मालिकेतून बाहेर झाला आहे.

आज वडोदरा (Vadodara) येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सरावादरम्यान ऋषभ पंत फलंदाजी करत होता मात्र सरावादरम्यान एका थ्रोडाऊन स्पेशालिस्टने फेकलेला चेंडू त्याच्या कंबरेवर लागला. यानंतर त्याला उपचारासाठी मैदानाबाहेर नेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतला उजव्या बाजूला स्नायूंवर दुखापत झाले असल्याने तो न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) आजपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.

तर दुसरीकडे आतापर्यंत ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून (BCCI) कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पुढील काही तासात बीसीसीआय ऋषभ पंतच्या जागी भारतीय संघात नवीन खेळाडूची घोषणा करु शकते. ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघात संजू सॅमसन किंवा इशान किशनला भारतीय संघात संधी मिळू शकते.

मकर संक्रांतीला ‘या’ 5 गोष्टी दान करा, गरिबी होणार दूर

ऋषभ पंतने जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तो 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता, परंतु तो एकही सामना खेळला नाही. नुकतंच 2025-26 विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत होता आणि त्याने सर्व्हिसेस आणि रेल्वेविरुद्ध अर्धशतके झळकावली होती.

Exit mobile version