IND vs PAK Asia Cup : भारताचा पाकवर आतापर्यंतचा ‘विराट’ विजय; कोहली, राहुलनंतर कुलदीपचाही पराक्रम

IND vs PAK Asia Cup : आशिया चषकातील सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी पराभव केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकवर सर्वात मोठा विजय मिळविला आहे. भारताने पाकसमोर विजयासाठी 357 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युत्तरात पाकिस्तान 32 षटकांत केवळ 128 धावाच करू शकला आहे. पाकचे आठ गडी बाद झाले. नसीम शाह आणि […]

India Won

India Won

IND vs PAK Asia Cup : आशिया चषकातील सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी पराभव केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकवर सर्वात मोठा विजय मिळविला आहे. भारताने पाकसमोर विजयासाठी 357 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युत्तरात पाकिस्तान 32 षटकांत केवळ 128 धावाच करू शकला आहे.

पाकचे आठ गडी बाद झाले. नसीम शाह आणि हारिस रऊफ हे दुखापतग्रस्त झाल्याने ते फलंदाजीसाठी आलेच नाही. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने पाच गडी बाद केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा कुलदीपने असा पराक्रम केला आहे. याचबरोबर भारतीय संघ सुपर चारमध्ये अव्वल स्थानावर गेला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील लढत पावसामुळे रविवारी होऊ शकली नाही. ही लढत सोमवारी झाली. भारताने 24.1 षटकांपासून 2 बाद 147 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरवार भारताने 2 बाद 356 धावांवर मजल मारली. विराटने 94 चेंडूत 122 नाबाद धावा केल्या. तर राहुलने 106 चेंडूत 111 धावा केल्या आहेत.

Exit mobile version