Download App

IND vs PAK : कोलंबोमध्ये पावसाचा खेळ, डकवर्थ लुईस नुसार काय असेल गणित ?

Asia Cup 2023 : आशिया कपमधील सुपर-4 मधील भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा पावसामुळे थांबला आहे. काही वेळा पाऊस थांबला होता. त्यानंतर कव्हर हाटवण्यात आले होते. परंतु आता कोलंबोमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या तरी सामना सुरू होण्याची शक्यता नाही. खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 11 षटकात 2 गडी गमावून 44 धावा आहे. आता षटकांमध्ये निश्चित कपात केली जाऊ शकते. डकवर्थ लुईस नियम देखील लागू होऊ शकतो.

डकवर्थ लुईसमुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार
सामना लवकर सुरू झाला नाही तर पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. डकवर्थ लुईसची अंमलबजावणी झाल्यास पाकिस्तानला 20 षटकात 200 धावांचे लक्ष्य मिळेल. 22 षटकात 216 धावा करायच्या आहेत. 24 षटकांत 230 धावा आणि 26 षटकांत 244 धावांचे आव्हान असेल.

Asia Cup 2023 : किंग कोहलीने ठोकले 47 वे शतक, सचिनचा विक्रम मोडला

कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघासमोर विजयासाठी 357 धावांचे लक्ष्य आहे. मात्र, सध्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत पाकिस्तानी संघ 11 षटकांत 2 बाद 44 धावांवर झुंजत होता. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझम पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. जसप्रीत बुमराहने इमाम उल हकला बाद केले. तर हार्दिक पांड्याने बाबर आझमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Tags

follow us