Download App

IND vs SA 2024 : भारतासह आफ्रिकेचाही टेन्शन वाढणार, फायनलमध्ये धो धो पावसाचा अंदाज!

IND vs SA 2024 : टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने इंग्लंडचा

  • Written By: Last Updated:

IND vs SA 2024 : टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने इंग्लंडचा (Ind Vs Eng) 68 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. 29 जून (शनिवारी) भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) भिडणार आहे.

टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला (Afghanistan) पराभव केला होता. आफ्रिकेने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे 29 जून रोजी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे टी-20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे मात्र Accuweather ने दिलेल्या एका अहवालानुसार या भागात 29 जून रोजी ढगाळ आणि वादळी वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या सेमी फायनलप्रमाणे अंतिम सामन्यात देखील पावसाने वारंवार खेळ थांबू शकतो आणि पुन्हा एकदा सामना सुरु करण्यासाठी ग्राउंड स्टाफला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

Accuweather च्या अहवालानुसार, 29 जून रोजी या भागात ढगाळ आणि वादळी वातावरण असेल. काही काळ पावसाच्या शक्यते सोबतच दिवसाच्या सुरुवातीला वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना नियोजित वेळेपेक्षा लांबवावा लागू शकतो.

आनंदाची बातमी! शिंदे सरकार ‘या’ कुटुंबांना देणार वर्षाला 3 मोफत सिलेंडर

तर दुसरीकडे 29 जून जर सामना पूर्ण झाला नाहीतर त्यासाठी आयसीसीने (ICC) 30 जून रोजी राखीव दिवस देखील ठेवला आहे. मात्र या दिवशी देखील या भागात सकाळपासूनच ढगाळ आणि वादळी वातावरण राहणार असल्याची माहिती Accuweather ने आपल्या अहवालात दिली आहे. तसेच 30 रोजी या भागात सकाळपासूनच रिमझिम पावसासह ढगांच्या गडगडाटाचीही शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे

अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार

follow us

वेब स्टोरीज