Download App

IND vs SA : आज पहिला सामना; रिंकू सिंग खेळणार का? राहुलने केला मोठा खुलासा

IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर आजपासून एकदिवसीय (IND vs SA 1st ODI) क्रिकेट सामने सुरू होत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला सामना होत आहे. या सामन्याची तयारी दोन्ही संघांकडून केली जात आहे. सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधारी केएल राहुल (KL Rahul) याने मोठा खुलासा केला आहे. या सामन्याच्या आधी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राहुलने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राहुल म्हणाला, संजू सॅमसन पाच किंवा सहा नंबरला खेळेल. रिंकू सिंगला (Rinku Singh) आगामी मालिकेत संधी दिली जाईल. मी स्वतः विकेटकीपर असेल. चौथ्या क्रमांकावर मी फलंदाजी करू शकतो. त्यामुळे या सामन्यात ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला कोण असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या सामन्यासाठी लोकेश राहुल (कर्णधार), युजवेंद्र चहल, रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, साई सुदर्शन, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चाहर असा संभाव्य संघ आहे. आता प्रत्यक्षात यापैकी कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला डबल झटका; शमी, चहर आऊट

दोन स्टार गोलंदाजांची माघार 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) दौऱ्यातून माघार घेतली आहे. कसोटी मालिकेतून शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. कुटुंबाच्या वैद्यकीय कारणामुळे चहरने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी निवड समितीने आकाश दीपची निवड केली आहे. शमीबाबत आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, त्याचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

बीसीसीआयने याबाबतची माहिती शेअर केली आहे. यापूर्वी दीपक चहर आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही भारतीय संघाचा भाग होता, परंतु तो एकही सामना खेळला नाही, तो टीम इंडियासोबत आफ्रिकेत आला नव्हता. आता त्याने आजपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज शमीबाबत बीसीसीआयने सांगितले की, मेडिकल टीमने शमीच्या फिटनेसबद्दल स्पष्ट सांगितलेले नाही, त्यामुळे तो 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या अनुभवी गोलंदाजांच्या गैरहजेरीत भारताला एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता मैदानावर भारतीय संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us