Download App

IND vs SA : भारताच्या 11 चेंडूत 6 विकेट; वैतागलेल्या रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा तर होणारच!

IND vs SA : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या (IND vs SA) डावात भारताचा संघ सपशेल अपयशी ठरला. पहिल्या डावात आफ्रिकेला 55 धावांवर ऑलआऊट केलं. नंतर टीम इंडियाने (India vs South Africa) सुरुवातही दमदार केली. 4 बाद 153 अशी धावसंख्या होती. तिथून पुढे मात्र अवघ्या 11 चेंडूत 6 गडी गमावून संघ ऑलआऊट झाला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. त्यानंतर माजी खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केलेल्या खास वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. भारतीय संघ ऑलआऊट झाल्यानंतर रवी शास्त्री यांंनी केलेलं वक्तव्य व्हायरल होत असून माजी क्रिकेटपटूही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

IND vs SA 2nd Test : 92 वर्षांपू्र्वीचं रेकॉर्ड आज तुटणार? जाणून घ्या, 10 चेंडूंच्या सामन्याची स्टोरी

भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही रवी शास्त्री यांनी काम केले आहे. आता सामन्याच्या कॉमेंट्रीदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. भारतीय संघाच्या एकामागोमाग एक विकेट पडत असताना रवी शास्त्री म्हणाले, “जर कुणी टॉयलेटमध्ये गेला असेल तर तो परत येईपर्यंत भारत 153 धावांवर ऑलआऊट झालेला असेल.” त्यांच्या या वक्तव्यावर आता माजी क्रिकेटपटूही प्रतिक्रिया देत आहेत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या 6 विकेट केवळ 11 चेंडूत एकही धाव न करता गेल्या. भारताच्या डावात एकूण 7 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतीय संघ पहिल्या डावात 153 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे टीम इंडियाला 98 धावांची आघाडी मिळाली होती.

एकवेळ भारतीय संघाने 153 धावांच्या स्कोअरवर केवळ 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील 11 चेंडूंमध्ये एकूण 6 भारतीय फलंदाज बाद झाले आणि एकही धाव जोडता आली नाही. टीम इंडियाने 33 षटकात 4 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या आणि यावेळी विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर होते. डावाचे 34 वे षटक टाकणाऱ्या आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला झेलबाद केले. त्यानंतर अँगिडीच्या षटकातील दुसरा चेंडू डॉट बॉल होता. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर अँडिगीनेही जडेजाला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने बुमराहला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे अँगिडीने आपल्या पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या होत्या.

IND vs SA ODI : गुलाबी जर्सीत दिसणार आफ्रिकेचे खेळाडू; क्रिकेट बोर्डाने कारणही सांगितलं

follow us

वेब स्टोरीज