IND vs SA 2nd Test : 92 वर्षांपू्र्वीचं रेकॉर्ड आज तुटणार? जाणून घ्या, 10 चेंडूंच्या सामन्याची स्टोरी

IND vs SA 2nd Test : 92 वर्षांपू्र्वीचं रेकॉर्ड आज तुटणार? जाणून घ्या, 10 चेंडूंच्या सामन्याची स्टोरी

IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी (IND vs SA 2nd Test) सामन्यात विकेट्सचा पाऊसच पडला. या सामन्यात एकाच दिवसात तब्बल 23 विकेट्स पडल्या. कसोटी क्रिकेटमधील 146 वर्षांच्या इतिहासात फक्त चार वेळेस घडला आहे ज्यावेळी एका दिवसात 23 पेक्षा जास्त विकेट्स पडल्या. आता केपटाऊन येथे सुरू असलेला भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील हा सामना एक नवे रेकॉर्ड बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे रेकॉर्ड कोणते असेल तर सर्वात लहान कसोटी सामन्याचे ज्यात सामन्याचा निकालही लागलेला असेल.

क्रिकेटमधील सर्वात लहान सामन्याचे रेकॉर्ड वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लँड या सामन्याचे आहे. सन 1907 मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात फक्त 10 चेंडू टाकले गेले होते. या सारखे आणखीही काही सामने आहेत ज्यामध्ये 100 चेंडूंच्या आत संपले. खरं तर हे सगळे सामने अनिर्णित राहिले होते यातील एकही सामन्याचा निकाल लागला नाही.

IND vs SA Test : आफ्रिकेला दुसरा धक्का! बावुमानंतर ‘या’ खेळाडूची दुसऱ्या कसोटीतून माघार

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना 1932 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात फक्त 656 चेंडू टाकले गेले. ऑस्ट्रेलियाने हा सामना 72 धावांना जिंकला. आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 36 आणि दुसऱ्या डावात 45 धावा करू शकला होता. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डाव्यात 153 आणि दुसऱ्या डावात तर ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्याची गरजच पडली नाही. या सामन्यात 109.2 ओव्हर टाकल्या होत्या.

आता केपटाऊनमध्ये सुरू असलेला हा सामना 92 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तोडू शकतो. या सामन्यात आतापर्यंत 75.1 ओव्हर टाकल्या गेल्या आहेत. या सामन्यात दोन्ही बाजूंच्या 23 विकेट्स पडल्या. पहिल्या डावात 55 धावात आफ्रिकेचा संघ ऑलआऊट झाला होता. तर दुसऱ्या डावात 62 धावा झाल्या असून 3 विकेट पडल्या आहेत.

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. जर भारतीय गोलंदाजांनी अशीच कामगिरी केली तर आफ्रिकेचे फलंदाज 20-25 ओव्हरच्या आतच आऊट होईल. जर असं घडलं तर भारताला अतिशय कमी धावांचे आव्हान मिळेल. त्यामुळे आजचा दिवस क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामन्याचा साक्षीदार बनला तर आश्चर्य वाटायला नको.

टीम इंडियाच्या 11 चेंडूत 6 विकेट पडल्या, 7 फलंदाज शून्यावर आऊट; अजूनही आघाडी कायम

एकाच दिवसांत 23 विकेट्सचा पाऊस

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात केपटाऊनमध्ये खेळली जात असलेली दुसरी कसोटी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या 6 विकेट केवळ 11 चेंडूत एकही धाव न करता गेल्या. भारताच्या डावात एकूण 7 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतीय संघ पहिल्या डावात 153 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे टीम इंडियाला 98 धावांची आघाडी मिळाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube