IND vs SA Test : आफ्रिकेला दुसरा धक्का! बावुमानंतर ‘या’ खेळाडूची दुसऱ्या कसोटीतून माघार

IND vs SA Test : आफ्रिकेला दुसरा धक्का! बावुमानंतर ‘या’ खेळाडूची दुसऱ्या कसोटीतून माघार

IND vs SA Test : भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकल्याचा आनंद सध्या दक्षिण आफ्रिका संगाला घेता (IND vs SA Test) येत नाही. कारण, हा सामना जिंकल्यानंंतर आफ्रिका संंघाला एकापाठोपाठ एक दोन जबर धक्के बसले आहेत. आधी दुखापतीमुळे कर्णधार टेंबा बावूमा (Temba Bavuma) संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जी सुद्धा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीच्या वेळी तो पूर्णपणे फिट नसल्याचे दिसून आले होते. या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. मात्र या सामन्यात आता कोएत्जी दिसणार नाही. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या जागी कुणाला संधी मिळेल याबाबत अद्याप संघ व्यवस्थापनाने काहीही माहिती दिली नाही. लुंगी एनगिडीला संधी मिळू शकते असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. पहिल्या डावात केएल राहुल आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीची झुंजार खेळी वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराबू झाली. रोहित शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. तर यशस्वी जैस्वाल हा 5 धावांवर बाद झाला. शुबमन गिलही मोठी खेळी करू शकला नाही. तोही 26 धावांवर बाद झाला. तर विराट कोहलीने एकतर्फी झुंज दिली. त्याने 76 धावांची खेळी केली. इतर फलंदाज लवकरच तंबूत परतले. श्रेयस अय्यर सहा आणि केएल राहुल हा चार धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात बर्गरने चार आणि रबाडाने दोन आणि यानसेनने तीन विकेट घेतल्या. दोन्ही डावांमध्ये आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पहिल्या डावात केएल राहुलने 101 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर व इतर फलंदाज चांगला खेळ दाखवू शकले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube