IND vs SA ODI : गुलाबी जर्सीत दिसणार आफ्रिकेचे खेळाडू; क्रिकेट बोर्डाने कारणही सांगितलं

IND vs SA ODI : गुलाबी जर्सीत दिसणार आफ्रिकेचे खेळाडू; क्रिकेट बोर्डाने कारणही सांगितलं

IND vs SA ODI Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर आजपासून एकदिवसीय (IND vs SA 1st ODI) क्रिकेट सामने सुरू होत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला सामना होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू त्यांच्या नेहमीच्या हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या अंगात गुलाबी रंगाच्या जर्सी दिसतील. हा निर्णय का घेतला यामागचं कारण काय, या प्रश्नांचं उत्तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना आज दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होणार आहे. जोहान्सबर्ग येथील न्यू वँडर्स स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाचे (South Africa) खेळाडू गुलाबी रंगाची जर्सी परिधान करणार आहेत. या गुलाबी रंगाच्या जर्सी घालण्याचं कारण म्हणजे लोकांना ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूक करणे आहे.

IND vs SA : आज पहिला सामना; रिंकू सिंग खेळणार का? राहुलने केला मोठा खुलासा

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळणार आहेत. यामागचा उद्देश बेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करणे हा आहे. तसेच या सामन्यातून जमा होणारा पैसा ब्रेस्ट कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू त्यांच्या नेहमीच्या हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसणार नाहीत.

टीम इंडियाला दोन धक्के 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) दौऱ्यातून माघार घेतली आहे. कसोटी मालिकेतून शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. कुटुंबाच्या वैद्यकीय कारणामुळे चहरने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी निवड समितीने आकाश दीपची निवड केली आहे. शमीबाबत आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, त्याचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

बीसीसीआयने याबाबतची माहिती शेअर केली आहे. यापूर्वी दीपक चहर आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही भारतीय संघाचा भाग होता, परंतु तो एकही सामना खेळला नाही, तो टीम इंडियासोबत आफ्रिकेत आला नव्हता. आता त्याने आजपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले आहे.

Rohit Sharma ची कॅप्टन्सी अन् द्रविडचा कार्यकाळ; अफ्रिका दौऱ्यानंतर होणार मोठे निर्णय!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube