Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 मध्ये पोहोचलेले सर्व संघ विजेतेपदाच्या शर्यतीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा पुढील सामना 11 सप्टेंबर म्हणजे उद्या श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना राखीव दिवसांपर्यंत गेल्याने भारतीय संघाला सलग तीन दिवस मैदानात उतरावे लागणार आहे.
हे वेळापत्रक भारतीय खेळाडूंसाठी व्यस्त असू शकते आणि त्यामुळे दुखापत होऊ शकते. अशा परिस्थितीत रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करताना दिसू शकतो. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल होऊ शकतात. वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत रोहित शर्मा जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी, रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनचा भाग म्हणून खेळवू शकतो.
प्रसिद्ध कृष्णा 13 महिन्यांनंतर एकदिवसीय संघात?
प्रसिद्ध कृष्णा प्लेइंग इलेव्हनचा भाग झाला तर तो 13 महिन्यांनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करेल. प्रसिद्ध कृष्णाने 20 ऑगस्ट 2022 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात 6.1 षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली होती.
Asia Cup 2023 : किंग कोहलीने ठोकले 47 वे शतक, सचिनचा विक्रम मोडला
संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश थेक्षाना, कसून राजिता, मथिशा पाथिरना.