Download App

IND vs WI: दुसरा कसोटी सामना रोमांचक, शेवटच्या दिवशी भारताला जिकंण्यासाठी आठ विकेट्सची आवश्यकता

  • Written By: Last Updated:

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅरेबियन संघाने 2 बाद 76 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत, तर वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावा करायच्या आहेत. (Ind Vs Wi 2nd Test Day 4 Highlights West Indies Need 289-Runs Ravichandran Ashwin Two Wickets)

चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा तेगनारायण चंदरपॉल 24 आणि जर्मेन ब्लॅकवूड 20 धावांवर नाबाद परतले. दोघांमध्ये 32 धावांची भागीदारी झाली आहे. तत्पूर्वी, कर्णधार क्रेग ब्रेथवेट 28 आणि कर्क मॅकेन्झी 00 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. दोघांनाही रविचंद्रन अश्विनने बाद केले.

तत्पूर्वी, टीम इंडियाने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. अशा प्रकारे वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माशिवाय इशान किशनने अर्धशतक झळकावले.

Video : ‘नो बॉल’ तरी देखील साई सुदर्शन आऊट, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नवा वाद

रोहित शर्माने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली, तर इशान किशन 34 चेंडूत 52 धावा करून नाबाद माघारी परतला. रोहितने पाच चौकार आणि तीन षटकार मारले, तर ईशानच्या बॅटमधून चार चौकार आणि दोन षटकार आले. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॅरिकन यांना 1-1 असे यश मिळाले.

त्याचवेळी, याआधी भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नेत्रदीपक गोलंदाजी सादर केली. मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 5 खेळाडूंना आपला बळी बनवले.

Tags

follow us