Download App

टीम इंडियाने पुन्हा जिंकलेली मॅच हारली, वेस्ट इंडिजचा सलग दुसरा विजय

IND vs WI: टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून मात केली. टीम इंडियाचा या मालिकेतील सलग दुसरा पराभव. प्रथम फलंदाजी करताना भारताने 153 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. भारताकडून हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले. युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 67 धावांची शानदार खेळी केली.

निकोलस पूरन वेस्ट इंडिजसाठी हिरो ठरला. त्याने 40 चेंडूत 67 धावा केल्या. पुरनच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हेटमायरने 22 चेंडूत 22 धावा केल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. काइल मेयर्स 15 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

ब्रँडन किंग, जेसन होल्डर आणि शेफर्ड शून्यावर बाद झाले. अखेरीस अकिल हुसेन 16 धावा करून नाबाद राहिला. जोसेफने नाबाद 10 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी भारताच्या घशातील विजय हिसकावून घेतला. वेस्ट इंडिजच्या 129 च्या स्कोअरवर 8 विकेट्स गेल्या होत्या. मात्र तिला या दोन खेळाडूंना बाद करता आले नाही. अशा प्रकारे इंडियाने जिंकलेला सामना पुन्हा एकदा हरला.

Poet Gaddar Death : प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं निधन!

भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने 3 बळी घेतले. त्याने 4 षटकात 35 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 4 षटकात 34 धावा देत 1 बळी घेतला. रवी बिश्नोईने 4 षटकात 31 धावा दिल्या. तरीही त्याला एकही विकेट मिळाली नाही. युजवेंद्र चहलने 3 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. या दरम्यान तिलक वर्मा याने चमकदार कामगिरी केली. त्याने 41 चेंडूंचा सामना करत 51 धावा केल्या. तिलकच्या खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ईशान किशनने 23 चेंडूत 27 धावा केल्या. इशानच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

‘मन्नत’च्या बाल्कनीत सुहानाचे फोटोशूट, पाहा किलर लूक

हार्दिक पांड्याने 24 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेल 14 धावा करून बाद झाला. अर्शदीप सिंग 6 धावा करून नाबाद राहिला आणि रवी बिश्नोईने 8 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 1 धावा करून बाद झाला. शुभमनने 7 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने 4 षटकात 28 धावा देत 2 बळी घेतले. रोमारियो शेफर्डने 3 षटकांत 28 धावा देत 2 बळी घेतले. हुसेनने 4 षटकात 29 धावा देत 2 बळी घेतले.

Tags

follow us