Virat Kohli Met With The Mother Of Joshua Da Silva: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात विराट कोहलीने आपल्या बॅटने अनेक नवे विक्रम केले. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० वा सामना खेळणाऱ्या कोहलीने आपल्या २९व्या कसोटी शतकासह हा क्षण आणखी मोठा केला. त्याचवेळी दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटने विंडीजचा यष्टिरक्षक जोशुआ डी सिल्वाला दिलेले वचन पूर्ण करत त्याच्या आईची भेट घेतली.
वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक जोशुआ डी सिल्वाची आई दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर पोहोचली. ती विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे आणि तिला भेटल्यानंतर कोहलीने तिचे स्वप्नही पूर्ण केले. विराटला भेटल्यानंतर जोशुआच्या आईला अश्रू अनावर झाले होते. त्याने कोहली हा महान खेळाडू असल्याचेही सांगितले.
Virat Kohli : धोनीचा प्लॅन ठरला हिट अन् फ्लॉप ठरलेल्या विराटने केले जोरदार कमबॅक
विराटला भेटल्यानंतर जोशुआच्या आईने सांगितले की, ती आणि तिचा मुलगा कोहलीचे मोठे चाहते आहेत. हा क्षण त्यांच्यासाठी खूप मोठा आहे. विराट आपल्या देशात येऊन खेळतोय ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो खूप प्रतिभावान आणि महान खेळाडू आहे.
Box office collection: ‘ओपनहायमर’ने रचला नवा इतिहास; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!
The moment Joshua Da Silva's mother met Virat Kohli. She hugged and kissed Virat and got emotional. (Vimal Kumar YT).
– A beautiful moment! pic.twitter.com/Rn011L1ZXc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2023
कोहलीने आपल्या 29व्या कसोटी शतकासह अनेक खास टप्पे गाठले. आता तो जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या टॉप-10 खेळाडूंच्या यादीत डॉन ब्रॅडमनसोबत संयुक्तपणे १०व्या क्रमांकावर आहे. याशिवाय कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या जॅक कॅलिसच्या १२ शतकांची बरोबरी केली आहे. आता फक्त सुनील गावस्करच त्याच्या पुढे आहेत, त्यांनी विंडीज संघाविरुद्ध 13 शतके झळकावली आहेत.