Download App

विश्व विजेता टीम इंडिया भिडणार झिम्बाब्वेशी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

IND vs ZIM Live Streaming : टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) नंतर आजपासून भारतीय संघ झिम्बाब्वेशी पाच टी 20 (IND vs ZIM) सामन्यांची

IND vs ZIM Live Streaming : टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) नंतर आजपासून भारतीय संघ झिम्बाब्वेशी पाच टी 20 (IND vs ZIM) सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे तर या संघाचा नेतुत्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) देण्यात आला आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी या संघात T20 विश्वचषक संघातील कोणताही खेळाडू नसणार आहे. तिसऱ्या सामान्यापासून भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्या समावेश होणार आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे पाहू शकतात.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला T20 सामना कधी आणि कोठे खेळवला जाईल?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 6 जुलै रोजी पहिला T20 सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 4.30 वाजता होणार आहे तर टॉस दुपारी 4 वाजता होणार आहे.

कुठे पाहता येणार सामना ?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणारा पहिला T20 सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी स्पोर्ट्स टेन 3 (हिंदी), सोनी स्पोर्ट्स टेन 4 (तमिळ, तेलुगु) आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 (इंग्रजी) मध्ये तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकतात तसेच सोनी लिव्ह वनवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

पहिल्या 2 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) , हर्षित राणा.

Video : मी फडणवीसांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं; ‘लेट्सअप’च्या दणकेबाज मुलाखतीत पवार काय म्हणाले?

शेवटच्या 3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, संजू सॅमसन, शिवम दुबे, यशस्वि कुमार, यशस्वी जैस्वाल.

 

follow us