भारताचा 19 वर्षाखालील संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्राय सिरीजसाठी सज्ज झाला आहे. (BCCI) ही मालिका 17 नोव्हेंबर त 30 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या दोन संघांची घोषणा केली आहे. भारत अ आणि भारत ब संघाची घोषणा केली आहे. तर तिसरा संघ अफगाणिस्तानचा असणार आहे.
तिरंगी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारत अ अंडर 19 आणि भारत ब अंडर 19 संघांची घोषणा केली आहे. ही मालिका बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये होणार आहे. पण या स्पर्धेसाठी आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या दोन लोकप्रिय युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही. कारण ते उच्चस्तरीय संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. वैभव सूर्यवंशी एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी इंडिया ए संघाचा भाग आहेत. तर आयुष म्हात्रे रणजी ट्रॉफी खेळत आहे.
मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
विहान मल्होत्राला भारत अ अंडर 19 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर अभिज्ञान कुंडूला अ संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. तर आरोन जॉर्जला भारत ब अंडर 19 संघाचा कर्णधारआणि वेदांत त्रिवेदीला ब संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याच्या लहान मुलाला संघात स्थान मिळालं आहे. अन्वय द्रविडला भारत ब संघात स्थान मिळालं आहे.
भारत अंडर-19 अ संघ: विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), वाफी कच्छी, वंश आचार्य, विनीत व्हीके, लक्ष्य रायचंदानी, ए. रापोले (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, अनमोलजीत सिंह, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, आशुतोष महिदा, आदित्य रावत, मोहम्मद मलिक.
भारताच्या अंडर-19 ब संघ: आरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी (उपकर्णधार), युवराज गोहिल, मौल्यराज सिंग चावडा, राहुल कुमार, हरवंश सिंग (यष्टीरक्षक), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), आरएस अम्ब्रिस, बीके किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेशन जे, उधव मोहन, डी दीपेश, रोहितकुमार दास.
भारत अंडर 19 तिरंगी मालिकेचे वेळापत्रक
सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30 : भारत अ विरुद्ध भारत ब – स्थळ: बीसीसीआय सीओई
बुधवार, 19 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30 : भारत ब विरुद्ध अफगाणिस्तान – स्थळ: बीसीसीआय सीओई
शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30 : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान – स्थळ: बीसीसीआय सीओई
रविवार, 23 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30: भारत अ विरुद्ध भारत ब – स्थळ: बीसीसीआय सीओई
मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30 : भारत ब विरुद्ध अफगाणिस्तान – स्थळ: बीसीसीआय सीओई
गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30 : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान – स्थळ: बीसीसीआय सीओई
रविवार, 30 नोव्हेंबर 2025 – सकाळी 9.30 : अंतिम सामना – स्थळ: बीसीसीआय सीओई
