Rising Stars Asia Cup : बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या जितेश शर्माकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर वैभव सूर्यवंशीला देखील संघात स्थान देण्यात आले आहे.
अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. भारतीय संघामध्ये प्रियांश आर्य, नेहल वधेरा (Nehal Wadhera) आणि नमन धीर सारखे खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर इशान पोरेल बॅकअप विकेटकीपर म्हणून संघात असणार आहे. यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, विजय कुमार वैश आणि युद्धवीर सिंग चरक हे वेगवान गोलंदाजीचे पर्याय असणार असून समीर रिझवी आणि शेख रशीद यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान सामना
रायझिंग स्टार्स आशिया कप 14 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दोहा येथील वेस्ट एंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारत अ संघाला ओमान, यूएई आणि पाकिस्तान अ संघासह ब गटात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना रविवार, 16 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
India A squad for Rising Star Asia Cup previously known as Emerging Asia Cup. India not sending U23 team like earlier years. pic.twitter.com/6wpctPay5q
— Kushan Sarkar (@kushansarkar) November 4, 2025
आशिया कपसाठी भारत अ संघ
प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वधेरा, नमन धीर (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार) (यष्टीरक्षक), रमनदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, विजय कुमार वैश्य, युद्धवीर सिंग चरक, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुयश शर्मा.
राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद; निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?
स्टँडबाय खेळाडू
गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्र, तनुष कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद.
भारताचे रायझिंग स्टार्स आशिया कप वेळापत्रक
| दिवस | तारीख | प्रतिस्पर्धी |
| शुक्रवार | 14 नोव्हेंबर | यूएई |
| रविवार | 16 नोव्हेंबर | पाकिस्तान ए |
| मंगळवार | 18 नोव्हेंबर | ओमान |
