Asia Cup 2023 : सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघ 2023 च्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम खेळून 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 172 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत 5 बळी घेणारा ड्युनिथ वेलालगे 42 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. कुलदीपने चार विकेट घेतल्या.
रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहनेही 2-2 बळी घेतले. या सामन्यातील पराभवाबरोबरच श्रीलंकेचा एकदिवसीय क्रिकेटमधील सलग 13 सामने जिंकण्याची मालिकाही खंडित झाली.
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; खुर्च्या फेकून देत घातला गोंधळ…
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात टीम इंडियाचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज दुनिथा वेललागेने 5 तर चरिथ असलंकाने 4 बळी घेतले.