Download App

पराभवाचा वचपा दणकात काढला ! भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

टीम इंडियाकडून मुकेश कुमार, अवेश खान यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर रवी बैष्णोईने एक विकेट घेतली.

  • Written By: Last Updated:

India Beat Zimbabwe T-20 Series : टी-20 सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (India/strong>) झिम्बाब्वेवर (Zimbabwe) दणदणीत विजय मिळविला आहे. 235 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघ 134 धावांत गारद झाला. याचबरोबर पहिल्या सामन्यात पराभवाचा वचपाही टीम इंडियाने काढला आहे. टीम इंडियाकडून मुकेश कुमार, अवेश खान यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर फिरकी गोलंदाज रवी बैष्णोई याने एक विकेट घेतली. अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) तडाखेबाज शतकामुळे भारतीय संघाने झिम्बाब्वे समोर 235 धावांचे मोठे आव्हान दिले होते.

आम्हीच खरी शिवसेना, लहान बाळासारखे किती वेळा रडणार?, ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचे प्रत्युत्तर


शर्माबरोबर ऋतुराज, रिंकूची फटकेबाजी

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली गेली. पण दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कमबॅक केले. भारतीय फलंदाजांनी झिम्बाव्बेच्या गोलंदाजी अक्षरशः फोडून काढत तब्बल 234 धावांपर्यंत मजल मारली. त्यात अभिषेक शर्माने आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात तुफानी शतक झळकविले. त्याने 47 चेंडूत 100 धावा केल्यात. त्यात तब्बल आठ षटकार आणि सात चौकारचा समावेश आहे. विशेष म्हणजे अभिषेक शर्माने सलग तीन षटकार मारत आपले शतक झळकविले आहे. कर्णधार शुभमन गिल दोन धावांवर बाद धावा. तर ऋतूराज गायकवाडने 77 आणि रिंकू सिंगने 48 धावांची स्फोटक खेळी केली.

‘पापाचा घडा लपवण्यासाठी योजनांचं पांघरून…’; लाडकी बहिण योजनेवरून ठाकरेंचा हल्लाबोल

अभिषेक शर्माचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक आहे. तर त्याने आजच्या इनिंगचे खातेही षटकार मारत खोलले असून, पहिले अर्धशतक हे 33 चेंडूत झळकविले. पहिल्या सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता. परंतु दुसऱ्या सामन्यात ते जबरदस्त खेळला. 11 व्या षटकात डियोन मायर्सची त्याने धुलाई केली. या षटकात त्याने तब्बल 28 धावा केल्या. तर पहिल्या चेंडूवर त्याने दोन रण काढले. त्यानंतर चौकार मारला. तर तिसऱ्या चेंडूवर जबरदस्त षटकार मारत अर्धशतक झळकविले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही चौकार मारला. पाचव्या चेंडूवर षटकार मारला. तर शेवटच्या चेंडूवरही चौकार मारला. त्यानंतर अभिषेकने 13 चेंडूत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत शतक झळकविले. म्हणजे पुढच्या पन्नास धावा केवळ 13 चेंडूत काढल्या. त्यात पाच षटकार आणि दोन चौकार मारले. मसाकाजने शर्माला झेलबाद केले.

follow us