सामना जिंकला! भारतानं तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडला 8 विकेटनं पाणी पाजल

न्यूझीलंडला पहिला धक्का डेवोन कॉन्वेच्या रुपात बसला. कॉन्वे 1 रन करुन बाद झाला. हर्षित राणानं त्याची विकेट घेतली.

News Photo   2026 01 25T222028.067

सामना जिंकला! भारतानं तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडला 8 विकेटनं पाणी पाजल

टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात (Sports) न्यूझीलंडला तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये पराभूत केलं आहे. न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 बाद 153 धावा केल्या होत्या. भारतानं हे आव्हान 10 ओव्हरमध्ये पार केलं. भारतानं न्यूझीलंडला 8 विकेटनं पराभूत केलं. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे सूर्यकुमार यादवनं सलग दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं यानं 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा शानदार समारोप; ल्यूक मुडग्वेच्या नेतृत्वाखाली ‘ली निंग स्टार’ संघ विजयी

न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 10 ओव्हरमध्येच पार केलं. भारतानं 10 ओव्हरमध्ये 2 बाद 155 धावा केल्या. अभिषेक शर्मा 20 बॉलमध्ये 68 धावा करुन नाबाद राहिला. तर, सूर्यकुमार यादवनं 26 बॉलमध्ये 57 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 5 षटकार आणि 7 चौकार मारले. तर, सूर्यकुमार यादवनं 3 षटकार आणि 6 चौकार मारले. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला. त्याला आज खातं देखील उघडता आलं नाही. तर ईशान किशन यानं 28 धावा केल्या.

न्यूझीलंडला पहिला धक्का डेवोन कॉन्वेच्या रुपात बसला. कॉन्वे 1 रन करुन बाद झाला. हर्षित राणानं त्याची विकेट घेतली. हार्दिक पांड्यानं रचिन रविंद्रची विकेट घेतली. जसप्रीत बुमराहनं साईफर्टला बाद केलं. मार्क चॅम्पमन यानं 32 धावा केल्या, त्याची विकेट रवि बिश्नोईनं घेतली. डेरिल मिशेल 14 धावा करुन बाद झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं आणखी एका टी 20 मालिकेत विजय मिळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव फॉर्मसाठी संघर्ष करत होता.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेक शर्मानं देखील आज वादळी फलंदाजी केली. आगामी टी 20 वर्ल्ड कपपूर्वी दोन्ही आक्रमक फलंदाज फॉर्ममध्ये आल्यानं टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.

न्यूझीलंड संघाचा प्लेइंग-11 : डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (डब्ल्यू), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (क), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

भारतीय संघाचा प्लेइंग-11 : संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

Exit mobile version