टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक; न्यूझीलंडला 53 धावांनी नमवलं…

India Vs New Zealand भारतीय महिला संघाने न्यूझीलंड संघाचा 53 धावांनी पराभव करत वनडे विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीयं.

India

Untitle (18)

India Qualified for Women’s ODI WC Semi final : भारताच्या महिला संघाने न्यूझीलंडचा पराभव करत वनडे विश्वचषक 2025 सेमीफायनलमध्ये धडक मारलीयं. भारतीय संघाने न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव केला आहे. स्मृती मानधना, प्रतिक रावलची 212 धावांची भागीदारी आणि दोघींच्या शतकी खेळी सामन्याच्या विजयामध्ये महत्वपूर्ण भूमिका ठरलीयं.

बिहारमध्ये इंडिया गठबंधनची मोठी घोषणा; तेजस्वी यादव मुंख्यमंत्री पदाचे उमेदवार

भारतीय संघाने अटीतटीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाने 3 बाद 340 धावा केल्या. भारतात वनडे वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. पावसामुळे डीएलएस पद्धतीने न्यूझीलंडला विजयासाठी 325 धावांचं लक्ष्य मिळालं.

आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कितीही कट कारस्थानं करा…, धंगेकरांचा जैन बोर्डिंग प्रकरणात मोठा दावा

सामन्यादरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 44 षटकांचा झाल्याने न्यूझीलंडला विजयासाठी 325 धावांच आव्हान देण्यात आलं. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकांत सुझी बेट्सला क्रांती गौडने झेलबाद केलं. तर जॉर्जिया प्लाईमर 30 धावा सोफी डिव्हाईन 6 धावा करत रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाल्या. तर अमेलिया 45 धावांवर स्नेह राणाच्या गोलंदाजीवर बाद झाली.

Exit mobile version