IND vs AFG: टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात ‘कमबॅक’; गोलंदाजीमध्ये मोठे बदल

India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (India vs Afghanistan T20 Series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचे पुन्हा टी-20 संघात कमबॅक झाले आहे. तर संघाची जबाबदारी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाले आहे. तर ऋतुराज […]

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुध्दच्या टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात 'कमबॅक'; गोलंदाजीमध्ये मोठे बदल

Rohit Sharma Virat

India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (India vs Afghanistan T20 Series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचे पुन्हा टी-20 संघात कमबॅक झाले आहे. तर संघाची जबाबदारी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाले आहे. तर ऋतुराज गायकवाडला मात्र संघात स्थान मिळू शकले नाही. गोलंदाजीमध्ये काही बदल करण्यात आले असून, प्रमुख गोलंदाजांनी विश्रांती देऊन नवीन गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. येत्या 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर रोहित शर्मा हा टी-20 संघात परतला आहे.

2019 ला सेनेसोबत मग आता भाजपसोबतच काय बिघडलं? अजितदादांचा खडा सवाल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणारे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाजांची जबाबदारी अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्यावर देण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई यांच्यावर फिरकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Maratha Reservation : अखेर मनोज जरांगेंची ‘कुणबी’ची नोंद घावली….

तर शिवम दुबे याला संघात स्थान मिळाले आहे. तर रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, संजू सॅमसन यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असलेल्या हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही जखमी आहेत. त्यामुळे दोघेही या मालिकेतून बाहेर झालेले आहेत.

पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीमध्ये दुसरा सामना 14 जानेवारीला इंदौर आणि तिसरा सामना 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे.


अफगाणिस्तानचा संघ
-इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इकराम अलीखिल, हजरतुल्लाह जजई, मोहम्मद नबी, करीम जनत, रहमत शाह, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, केस अहमद, गुलबदीन नायब, राशिद खान.

Exit mobile version