Maratha Reservation : अखेर मनोज जरांगेंची ‘कुणबी’ची नोंद घावली….
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत अनेकदा आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठीच सरकारने गठित केलेल्या शिंदे समितीला जवळपास 13 हजार पुरावे आढळून आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा अद्याप कुणबी असल्याचा पुरावा घावत नव्हता. अखेर मनोज जरांगे यांच्या तक्रारीनंतर आता जरांगे पाटलांचाही कुणबी असल्याचा पुरावा अधिकाऱ्यांना सापडला आहे.
राज्यात गुन्हेगारी वाढते! सुळेंच्या आरोपांवर फडणवीसांनी मविआ काळातलं सगळंच काढलं
राज्य सरकारने मनोज जरांगे यांना उपोषणादरम्यान, आश्वासित केल्यानंतर सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून राज्यासह परराज्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची मोहिम सुरु होती. या मोहिमेत शिंदे समितीला अनेक नोंदी आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
साध्या गोष्टींमध्येही नाविन्य आणतात… : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून गुजरातींचे तोंडभरुन कौतुक
एकट्या मराठ्यावाड्यात जवळपास 13 हजार नोंदी आढळल्याचा अहवाल शिंदे समितीकडून शासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्या नोंदीची शहानिशा करुन मराठा समाजातील तरुणांना दाखल्याचं वाटप करण्याचं काम सुरु आहे. अशातच मनोज जरांगे कुणबी आहेत का? असा सवाल केला जात होता.
खोटे बोलून शिवसैनिकांचा विश्वासघात केलेल्यांना जागा दाखवणार, CM शिदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
अखेर मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी गावात त्यांची नोंद आढळून आली आहे. भूमी अभिलेख उपधीक्षक, अधिकारी अल्पेश पाटील, आणि मोडी अभ्यासक संतोष यादव यांना जरांगेंचा ब्रिटीश कालीन 1880 चा दस्ताऐवज आढळून आला आहेत. या दस्ताऐवजावरुन मनोज जरांगे कुणबी असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुरावा मिळाला तेव्हा मनोज जरांगे याचे वडील रावसाहेब जरांगे हे अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते.
या तालुक्यात अधिकाऱ्यांना 1880 च्या काळातील इतरही मराठा समाजबांधवांच्या नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदीमध्ये जवळपास 34 गावांतील 151 नोंदी 33-34 नमुन्यात आढळून आल्या असून 2620 पैकी 2469 नोंदी आढळून आल्या आहेत. तालुक्यातील घाटशिळपारगाव व जाटनांदूर, हाजीपुर, फुल सांगवी, तिंतरवणी, तरडगव्हण भोसले, गावात नोंदी मिळाल्या आहेत.