राज्यात गुन्हेगारी वाढते! सुळेंच्या आरोपांवर फडणवीसांनी मविआ काळातलं सगळंच काढलं
Devendra Fadnvis On Supriya Sule : राज्यात सध्या हत्या, ड्रग्ज तस्करीची प्रकरणं उघडकीस येत असल्याने विरोधकांकडून या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सुळेंच्या या आरोपांवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मौन सोडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळातील गुन्ह्यांचा दाखला देत सुळेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
‘काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना!’ अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तत्कालीन महाविकास आघाडीचा गृहमंत्री होता त्यावेळेस राज्यात किती आलबेल होतं. त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, गृहमंत्र्यावर 100 कोटींचे आरोप लागत नव्हते, साक्षीदारांच्या हत्या केल्या जात नव्हत्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती चांगलं काम होतं होतं, सचिन वाझे तर लादेन नव्हताच… त्यामुळे आता याच्यावर काय उत्तर द्यायचं, लोकं भूमिका बदलत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
कोरोनाला हलक्यात घेऊ नका, दिवसभरात 154 नव्या रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू
पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याच्यावर त्याच्याबरोबर असलेल्या साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर व इतर दोघांनी गोळीबार केला होता. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. शरद मोहोळच्या या हत्येची सध्या राज्यभरात चर्चा आहे. त्यावरुन राज्यातील गुन्हेगारीवरुन विरोधकांकडून सत्ताधारी सरकारलाच वेठीस धरलं जात आहे.
खोटे बोलून शिवसैनिकांचा विश्वासघात केलेल्यांना जागा दाखवणार, CM शिदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वच गोष्टीवर वेळेवर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली होती.