Download App

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर जय शाहांची मोठी घोषणा! क्रिकेटपटूंना होणार कोट्यवधींचा फायदा

India vs England 5th Test : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका (Test series)शनिवारी पार पडली. धर्मशाळामध्ये (Dharamshala)पार पडलेला पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah )यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

‘आर्टिकल 370’चं दुसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण! बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रत्येक मोसमामध्ये किमान सात कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंची मॅच फी सध्याच्या 15 लाख रुपयांवरुन 45 लाख रुपये करण्याची मोठी घोषणा केली आहे. एका मोसमामध्ये साधारण 10 कसोटी सामन्यांमध्ये सहभाग होणाऱ्या कसोटीपटूला 4.50 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळेल.

ही रक्कम खेळाडूंना वार्षिक केंद्रीय करारांतर्गत मिळणाऱ्या रिटेनगर फी व्यतिरिक्त असणार आहे, अशी माहिती जय शाह यांनी दिली आहे. बीसीसीआयने ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत कसोटी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना मोठा फायदा मिळणार आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना आता मॅच फी व्यतिरिक्त पैसे मिळणार आहेत.

ठाकरे गटातील दुफळी चव्हाट्यावर… वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध

जय शाहांनी x वर म्हटलंय की, भारतीय पुरुष कसोटी संघातील खेळाडूंसाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरु केल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे, हे पाऊल आमच्या सन्माननीय खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. 2022-23 हंगामापासून सुरु होणारी, ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ ही INR 15 लाख असलेल्या कसोटी सामन्यांसाठी विद्यमान मॅच फीच्यावर अतिरिक्त बक्षीस संरचना म्हणून काम करेल.

follow us