Download App

आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का? बीसीसीआय सचिवांचं फायनल उत्तर

आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे. 

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धा येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणार (Asia Cup 2025) आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील क्रिकेट टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. यात सर्वाधिक हायहोल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकात येत्या 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामना निश्चित करण्यात आला आहे.

परंतु, सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांत तणावाचे वातावरण आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवले. थेट पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. त्यामुळे पाकिस्तानशी क्रिकेट नकोच अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे.

चक दे इंडिया! आशिया कप हॉकी स्पर्धेत मलेशियावर मात; सुपर 4 मध्ये टीम इंडियाच ‘दादा’

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सैकिया यांनी सांगितले की पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांच्याबाबतीत (India vs Pakistan) बीसीसीआयचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन करतो. सरकारने एक धोरण ठरवलं आहे आणि या धोरणाला मान्य करावं लागेल. सरकारच्या धोरणाचं पालन करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही.

शुभमन गिलचं भवितव्य काय

शुभमन गिलला तिन्ही प्रकारांतील कर्णधारपद दिल्या जाण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता सैकिया म्हणाले, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. आताची वेळ तशी नाही. कोणत्याही खेळाडूच्या भवितव्याच्या बाबतीत घाईगडबडीत काही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही. दरम्यान, येत्या 30 सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत महिला वनडे वर्ल्डकप सुरू होणार आहे. टीम इंडिया मागील दोन वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी केली होती असे सैकिया यांनी सांगितले.

Asia Cup Hockey 2025 : आशिया कपमध्ये भारताची शानदार सुरुवात, चीनचा 4-3 ने पराभव

follow us