Sanju Samson T20 century vs South Africa: स्फोटक भारतीय फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या टी-20 सामन्यात धमाकेदार शतक झळकवत इतिहास रचला आहे. आफ्रिकेतील किंग्समिडच्या मैदानावर संजू सॅमसनने अवघ्या 47 धावांत शतक झळकविले आहे. त्याने सलग दोन शतके ठोकत इतिहास रचला आहे.
संजू सॅमसनने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकविले आहे. त्याने 50 चेंडूत 107 धावांची धुव्वाधार खेळी केली. त्यात सात चौकार आणि दहा षटकार मारले आहे. षटकार आणि चौकारांतून त्याने तब्बल 88 धावा काढल्या आहे. संजू सॅमसनने मैदानावर अक्षरशा: षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.
सलग दुसरे शतक
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ हा बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळला होता. हैदराबादमधील तिसऱ्या सामन्यात संजूने अवघ्या 40 चेंडूंमध्ये शतक झळकविले होते. त्याने 47 चेंडूत 111 धावांची खेळी केली होती. सलग दोन शतके झळकविण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. टी-20 मध्ये शतक झळकविण्याच्या यादीत तो केएल राहुलबरोबर आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर माजी कर्णधार रोहित आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे प्रत्येकी चार-चार शतके झळकवत पहिल्या क्रमांकावर आहेत.
आफ्रिकेला 203 धावांचे टार्गेट
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने आठ बाद 202 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी आफ्रिकेसमोर 203 धावांचे टार्गेट ठेवले आहे. संजू सॅमसननंतर यूर्यकुमार यादवने 21 आणि तिलक वर्माने 33 धावांची खेळी केली आहे. तर रिंकू सिंग 11 धावा करू शकला.
#SanjuSamson smashes century 🔥#India 202/8 after 20 overs v #SouthAfrica
Can #Markram & Co. chase the target❓
Join @ImZaheer, @DineshKarthik & @gauravkapur, on #CricbuzzLive#SAvIND https://t.co/ozeFhRGPei
— Cricbuzz (@cricbuzz) November 8, 2024