India vs Sri Lanka 1st T20: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्या (India vs Sri Lanka 1st T20) टी-20 सामन्यात लंकेला पराभूत केले. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने लंकेसमोर 214 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने शानदार अर्धशतक झळकविले. प्रत्युत्तरात लंकेचा (sri lanka) संघ 170 धावांत गारद झाला. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकलाय.
Paris Olympics 2024 मध्ये ‘चक दे! इंडिया’, न्यूझीलंडचा उडवला धुव्वा
रियान परागने (Riyan Parag) 1.2 षटके टाकत तीन विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रवी बिश्वोइने आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. लंकेकडून पथूम निशांकाने 79 धावांची खेळी केली. तर त्याला कुशल मेंडिसने साथ 45 धावा केल्या. या जोडीने पहिल्या विकेट्साठी 84 धावांची भागिदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम गाळायला लावला. अक्षर पटेलने निशांकाचा बोल्ड करत भारताला पहिले यश मिळवून दिले. 140 धावांवर निशांका बाद झाला. त्यानंतर लंकेचा गळती लागली. एकामागून एक फलंदाज माघारी फिरला. टॉपचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर उर्वरित सहा फलंदाज दोन आकडी धावाही करू शकले नाहीत.
Paris Olympics 2024 मध्ये लक्ष्य सेनची धमाकेदार सुरुवात, केविन कॉर्डेनचा केला पराभव
भारताने 20 षटकांत 7 विकेट्स देत 213 धावा काढल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. दिलशान मदुशंकाने शुभमन गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने 16 चेंडूत 34 धावांची खेळी केली. त्यानंतर जैस्वालही तंबूत परताल. त्याने 21 चेंडूत 40 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव व रिषभ पंतने तिसऱ्या विकेटसाठी 76 भागिदारी केली. तर सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत अर्धशतक झळकविले. त्याने 58 धावा केल्या. हार्दिक पांड्याने दहा चेंडूत नऊ धावा केल्या. तर रिषभ पंत हा 33 चेंडूत 49 धावा केल्या. श्रीलंकेकडून मथीशा पथिराने चार विकेट्स घेतल्या.
A 43-run victory in the first T20I! 🙌#TeamIndia take a 1-0 lead in the series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND pic.twitter.com/zZ9b1TocAf
— BCCI (@BCCI) July 27, 2024