Download App

मोठी बातमी! ‘या’ दिवशी भारताला मिळणार कसोटीमध्ये नवीन कर्णधार

India New Test Captain : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने भारताचा कसोटीमध्ये पुढचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे

India New Test Captain : रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने भारताचा कसोटीमध्ये पुढचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बीसीसीआय (BCCI) लवकरच कसोटीसाठी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा करणार आहे. माहितीनुसार, बीसीसीआय 23 मे रोजी भारताच्या नवीन कर्णधाराचा नाव जाहीर करणार आहे. याच दिवशी जुनमध्ये इंग्लंड विरुद्ध (INDvsENG) होणाऱ्या पाच कसोटी सामनांच्या मालिकेसाठी देखील भारतीय संघाची घोषणा होणार आहे.

भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड 23  मे रोजी होऊ शकते. या दिवशी नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले जाईल. निवड समितीच्या बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले तरी, बीसीसीआय नवीन कसोटी कर्णधाराचे नाव जाहीर करण्यासाठी मीडिया कॉन्फरन्स आयोजित करण्याची योजना आखत आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाची निवड पुढील काही दिवसांत होण्याची अपेक्षा आहे.

चाहत्यांना विराट कोहली देणार धक्का? 

तर दुसरीकडे या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत विराट कोहलीने बीसीसीआयशी चर्चा देखील केली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बीसीसीआयकडून विराटने पुन्हा एकदा विचार करावा असा आवाहन करण्यात आला आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

भारत- पाकिस्तानमध्येच नव्हे तर ‘या’ 4 युद्धांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावली महत्वाची भूमिका

follow us