भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या रोमांचक (India) एकदिवसीय मालिकेतील पहिला सामन्यात भारताने बाजी मारली. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. एकदिवसीय सामन्यात शेवटच्या षटकात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.विराटच वादळी शतक निर्णायक ठरलं.
प्रथम फलंदाजी करताना भारताने विराट कोहलीच्या शतक आणि रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकांत आठ बाद 349 धावा केल्या. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 332 धावांतच गारद झाला. पाहुण्या संघाकडून मॅथ्यू ब्रिट्झके (72), मार्को जॅन्सन (70) आणि कॉर्बिन बॉश (67) यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून कुलदीप यादवने चार, तर हर्षित राणा यांनी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंगने दोन, तर प्रसिद्ध कृष्णाने एक बळी घेतला.
Video : विराटचं शतकी वादळ, दक्षिण आफ्रिकेला ठोकून काढलं, सेलिब्रेशनला काय घडलं?
350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात हर्षित राणाने त्यांना दोन जबरदस्त धक्के दिले. आधी रयान रिकेल्टन बाद झाला आणि त्याच ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्या वेळी आफ्रिकेचा स्कोर फक्त 7 धावा होता. यानंतर पाचव्या षटकात मार्करमही अर्शदीप सिंगचा शिकार झाला. पुढे जोर्जी आणि मॅथ्यू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत चांगली भागीदारी रचली. मात्र 15व्या षटकात कुलदीप यादवने जोर्जीला बाद करून भारताला मोठा दिलासा दिला. त्यानंतर ब्रेविसने चांगली खेळी केली, पण 22व्या षटकात हर्षित राणा पुन्हा चमकला आणि ब्रेविस 37 धावांवर बाद झाला.
यानंतर जान्सेन आणि ब्रिट्जके यांनी 97 धावांची भागीदारी करत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जान्सेनने केवळ 26 चेंडूत अर्धशतक ठोकले. परंतु 33व्या षटकात कुलदीप यादवने ही भागीदारी मोडत जान्सेनला 39 चेंडूत 70 धावांवर बाद केले. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार होते. याच षटकात कुलदीपने ब्रिट्जकेलाही तंबूत धाडले. ब्रिट्जकेने 72 धावा केल्या. पण त्यानंतर, बर्गर आणि बॉसने एक चांगली भागीदारी केली. पण, अर्शदीपने 47 व्या षटकात बर्गरला बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 18 धावांची आवश्यकता होती, परंतु प्रसिद्ध कृष्णाने बॉसला बाद केले.
India hold their nerves to secure a solid victory against South Africa in the first ODI 💪#INDvSA 📝: https://t.co/tnte0Vp08D pic.twitter.com/hwQYCDYdeO
— ICC (@ICC) November 30, 2025
