Download App

PV Sindhu : पीव्ही सिंधूची विजयी सलामी; पहिल्या सामन्यात एफएन अब्दुल रझाकचा केला पराभव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने विजयी सलामी दिली आहे. एफएन अब्दुल रझाकचा पराभव केला.

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूहिने आपल्या मोहिमेची धमाकेदार विजयाने सुरुवात केली आहे. सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सामन्यात मालदीवच्या एफएन अब्दुल रझाकचा 21-9, 21-6 असा पराभव केला. (Paris Olympics) सिंधूने 2016 रिओ ऑलिम्पिक आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकली होती.

आज भारत-श्रीलंका दोनदा भिडणार! आधी फायनल नंतर सीरिज सामना; वेळेतही बदल

पीव्ही सिंधूने पहिला सेट सहज जिंकला. तिने पहिला सेटमध्ये अब्दुल रझाकचा 21-9 असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये रझाक पुनरागमन करेल असं वाटलं होतं. पण पीव्ही सिंधूने तो सेट पण सहज जिंकला.

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पीव्ही सिंधूने पहिला सेट सहज जिंकला. तिने पहिला गेममध्ये अब्दुल रझाकचा 21-9 असा पराभव केला.

दुसऱ्या गेममध्ये रझाक पुनरागमन करेल असं वाटले होतं. पण पीव्ही सिंधूने तो गेम पण सहज जिंकला. आणि दुसरा गेम 21-6 अशा फरकाने जिंकून मोहिमेला सुरुवात केली. पीव्ही सिंधूने आता पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

follow us