Download App

Yashasvi Jaiswal : ‘यशस्वी’चा धमाका, आयसीसीने दिलं मोठं गिफ्ट; केन विल्यमसनही पिछाडीवर

Image Credit: letsupp

Yashasvi Jaiswal Won ICC Award : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या (Yashasvi Jaiswal) जबरदस्त कामगिरी करत आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने (ICC) यशस्वीला मोठं गिफ्ट दिलं आहे. यशस्वी जैस्वालची आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये यशस्वी जैस्वाल, पथुम निसांका आणि केन विल्यमसन यांचा समावेश होता.

यशस्वीने या दोन्ही खेळाडूंना मागे टाकत आयसीसीच्या पुरस्कारावर नाव कोरले. याआधी हा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर, विराट कोहली, शुभमन गिल यांचा समावेश आहे. त्यानंतर या यादीत आता यशस्वी जैस्वालचाही समावेश झाला आहे. अगदी कमी काळात चांगली कामगिरी करत त्याने यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीचे क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे.

यशस्वी जैस्वालचा ‘डबल धमाका’, बुमराहचा विकेटचा ‘षटकार’ भारताकडे भक्कम आघाडी

यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीतही (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली होती. तो 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला होता. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

जैस्वालने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात जैस्वालने भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 209 धावा केल्या. यानंतर, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने 214* धावा केल्या. याशिवाय जैस्वालने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही 80 धावांची खेळी केली होती.

IND vs ENG : कुलदीप-अश्विनच्या घातक गोलंदाजीपुढं इंग्लंडचं लोटांगण, 218 धावांवर संघ तंबूत

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने चांगली कामगिरी केली होती. परंतु, यशस्वी जैस्वाल सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे ते पाहता तो लवकरच क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांचे अनेक विक्रम मोडू शकतो, अशी शक्यता दिसत आहे.

follow us

वेब स्टोरीज