Shubman Gill : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार फलंदाजी करत भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडला आहे. गिलने इंग्लंडविरुद्धच्या (INDvsENG) दुसऱ्या कसोटी सामन्यात एजबॅस्टनच्या मैदानावर भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावून मालिकेची शानदार सुरुवात करणारा भारतीय कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील शानदार शतक झळकावले आहे. गिलने या सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले होते तर दुसऱ्या दिवशी देखील जबरदस्त फलंदाजी करत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात त्याने 150 धावांचा टप्पा पार केला आहे. 150 धावा करताच त्याने विरोट कोहलीचा विक्रम मोडला आहे.
1⃣5⃣0⃣ up for Captain Shubman Gill 👏👏#TeamIndia inching closer to the 400-run mark 👌👌
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/54hwUysVdg
— BCCI (@BCCI) July 3, 2025
एजबॅस्टन मैदानावर भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम आता गिलच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता, ज्याने 2018 मध्ये झालेल्या कसोटीत 149 धावांची खेळी खेळली होती. गिलच्या आधी या मैदानावर शतक झळकावणारा कोहली हा एकमेव भारतीय कर्णधार होता. याचबरोबर या मैदानावर भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम आता गिलच्या नावावर आहे.
Deepika Padukone ने रचला इतिहास, हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री
तर दुसरीकडे भारतीय फलंदाजाने या सामन्यात आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत 430 धावा केल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल 177 धावांवर खेळत असून रविंद्र जाडेजाने 89 धावा केल्या. तर पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालने भारतीय संघाला शानदार सुरुवात दिली होती. त्याने पहिल्या डावात 87 धावा केल्या आहे तर करुण नायरने 31 आणि पंतने 25 धावा केल्या आहेत.