Team India: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी आज मिक्स्ड डिसॅबिलिटी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध जून आणि जुलै 2025 मध्ये (INDvsENG) होणाऱ्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी डिफरंटली अॅबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया (DCCI) ने आज संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी मुख्य संघात 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर 4 खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
या मालिकेसाठी रवींद्र गोपीनाथ साने यांना कर्णधारपद देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी वीरेंद्र सिंग यांना देण्यात आली आहे. मिक्स्ड डिसॅबिलिटी व्हिटॅलिटी टी-20 मालिकेचा पहिला सामना 21 जून 2025 रोजी टॉन्टन येथे, त्यानंतर 23 जून रोजी वर्म्सली येथे दुसरा सामना होईल. 3 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता ब्रिस्टल येथे होणाऱ्या सातव्या टी-20 सामन्याने मालिकेचा समारोप होईल.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे
रवींद्र गोपीनाथ साने (कर्णधार) (पीडी), वीरेंद्र सिंग (उपकर्णधार) (बधिर), राधिका प्रसाद (पीडी), राजेश इरप्पा कन्नूर (पीडी), योगेंद्र सिंग (विकेटकीपर), नरेंद्र मांगोरे (पीडी), विक्रांत रवींद्र केणी (पीडी), साई आकाश (बधिर), उमर अश्रफ (बधिर), संजू शर्मा (बधिर), अभिषेक सिंग (बधिर), विवेक कुमार (बधिर), विकास गणेशकुमार (आयडी), प्रवीण नेलवाल (आयडी), ऋषभ जैन (आयडी), तरुण (आयडी)
राखीव खेळाडू: माजिद मगर (पीडी), कुलदीप सिंग (बधिर), कृष्णा गौडा (बधिर), जितेंद्र नागराजू (पीडी)
Maruti Suzuki देणार Tata ला धक्का; बाजारात लॉन्च करणार ‘ह्या’ कार्स
T20 मालिका वेळापत्रक
1 ला सामना : 21 जून
2 रा सामना : 23 जून
3 रा सामना : 25 जून
4 था सामना : 27 जून
5 वा सामना : 29 जून
6 वा सामना : 1 जुलै
7 वा गुरुवार : 3 जुलै