T20 World Cup 2026 साठी ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा; संजू सॅमसनला मिळणार संधी?

T20 World Cup 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

T20 World Cup 2026

T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आयसीसीकडून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 साठी वेळापत्रक देखील जारी करण्यात आले आहे. भारतीय संघ या विश्वचषकामध्ये 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

टी20 विश्वचषक 2026 साठी बीसीसीआय (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर रोजी टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) साठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या संघात संजू सॅमसनसह (Sanju Samson) शुभमन गिलला देखील संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना खेळणार आहे. पाच मालिकेच्या सामन्यात भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तर या मालिकेतील चौथा टी20 सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. टी20 विश्वचषक 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 8 मार्च रोजी फायनल सामना होणार आहे.

भारतीय संघ 7 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध 7 फेब्रुवारी खेळणार आहे. ग्रुप सामन्यात भारतीय संघ अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तानशी सामना खेळणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभाग घेणार असून या संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

ग्रुप अ: भारत, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स, पाकिस्तान

ग्रुप ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान

ग्रुप क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, इटली, नेपाळ

ग्रुप ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती

2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा.

लाडक्या बहि‍णींना धक्का, नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता थेट जानेवारीत मिळणार? जाणून घ्या सर्वकाही-

Exit mobile version