England Women vs India Women T20I Match Result : भारताच्या लेकींनी कमालच केली आहे. इंग्लंड (IND vs ENG) महिला क्रिकेट संघाचा पराभव करत टी 20 मालिका जिंकण्याची मोठी कामगिरी (Indian Women Cricket Team) केली आहे. दोन्ही संघातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी 20 मालिका जिंकली आहे. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. सन 2006 नंतर भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.
भारतीय महिला संघाने चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा सहा विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने तब्बल 19 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. याचबरोबर भारताची अष्टपैलू खेळाडी दिप्ती शर्मा हीने एक खास रेकॉर्डही केले आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तिने दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिने एकूण 128 सामन्यांत 145 विकेट्स घेतल्या आहेत. शर्माने पाकिस्तानच्या निदा डार हीला मागे टाकले आहे. निदा डारने 144 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची मेगन शुट्ट पहिल्या क्रमांकावर आहे. तिने 151 विकेट्स घेतल्या आहेत.
जबरदस्त, शानदार ‘या’ संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र
ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज अडखळत फलंदाजी करत होते. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना मोठे शॉट खेळता आले नाहीत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 20 ओव्हर्समध्ये फक्त 126 धावा केल्या. इंग्लंडच्या डावाची सुरुवात सोफिया डंकली आणि डॅनी वॅट या दोघींनी केली. डॅनी फक्त पाच धावा काढून बाद झाली. यानंतर लयीत दिसत असलेली सोफिया डंकली देखील फार काळ टिकू शकली नाही. दिप्ती शर्माने तिला बाद केले.
डंकलीने 19 चेंडूत 22 धावा केल्या. यानंतर एलिस कॅप्सी आणि कर्णधार टॅमसिन ब्यूमॉन्ट दोघींनी महत्वाची भागीदारी केली. 11 व्या ओव्हरमध्ये राधा यादवने टॅमसिनला परत तंबूत धाडले. टॅमसिनने 19 चेंडूत 20 धावा केल्या. यानंतर कॅप्सी सुद्धा 18 धावा काढून बाद झाली. यानंतर मात्र इंग्लंडचा डाव गडगडला. भारताकडून एन. चारिणी आणि राधा यादव या दोघींनी दोन-दोन विकेट घेतल्या. अमनज्योत कौर आणि दिप्ती शर्माने एक-एक विकेट घेतली.
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली राहिली. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 42 चेंडूत 56 धावांची भागादारी केली. सातव्या ओव्हरमध्ये शेफाली बाद झाली. तिने 19 चेंडूत 31 धावा केल्या. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात आली. नवव्या ओव्हरमध्ये भारताला दुसरा झटका बसला. स्मृती मंधाना 32 धावा करुन बाद झाली.
भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! महामु्काबला ठरला; ICC कडून टी20 विश्वचषकाची घोषणा
यानंतर इंग्लंड संघ पुन्हा वापसी करेल असे वाटत होते. परंतु, जेमिमा आणि हरमनप्रीत सिंह यांनी चांगली फलंदाजी केली. भारताचा स्कोअर 100 च्या पुढे नेऊन ठेवला. यानंतर भारताने सलग दोन विकेट गमावल्या. 16 व्या ओव्हरमध्ये हरमनप्रीत बाद झाली. तिने 26 धावा केल्या. यानंतर अमनज्योत कौर फक्त 2 धावा करून बाद झाली. यानंतर जेमिमा आणि ऋचा घोष यांनी संघाला विजयापर्यंत नेले. अशा प्रकारे भारतीय संघाने 17 ओव्हरमध्ये चार विकेट गमावून सामना जिंकला.