Download App

वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय, अफगाण संघाला 8 विकेटने हरवले

World cup 2023 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताला अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) 8 विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सलामीला आलेला रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला. कपिल देवचा विक्रम मोडत त्याने 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

तर भारतीय रोहितने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली. रोहित एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 7 शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक 2 बळी घेतले.

अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 8 विकेट गमावत 272 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 35 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. भारताच्या विजयात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहने सर्वात मोठे योगदान दिले.

सिक्सर किंग रोहित शर्माने झळकावले शतक, कपिल देव-सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

रोहित ईशानने शानदार सुरुवात केली
273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात दिली. भारताने अवघ्या 11.5 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची (112 चेंडू) भागीदारी केली.

अफगाणिस्तानचे गोलंदाज त्यांच्यासमोर पूर्णपणे असहाय दिसत होते. यादरम्यान रोहितने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला.

कोहलीची अर्धशतकी खेळी
यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने 55* आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने 25* धावा केल्या. कोहलीच्या डावात 6 चौकारांचा समावेश होता तर अय्यरच्या डावात 1 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता.

टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’

अफगाणिस्तानचे गोलंदाज अपयशी
अफगाणिस्तानकडून फक्त राशिद खानने 2 बळी घेतले. यादरम्यान राशिदने 8 षटकात 57 धावा दिल्या. इतर सर्व गोलंदाज रिकाम्या हाताने परतले. अजमतुल्ला उमरझाई हा संघासाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकात 8.50 च्या इकॉनॉमीमध्ये 34 धावा दिल्या.

Tags

follow us