Download App

INDW vs AUSW : भारताला डबल धक्का! महिला संघाचाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव

INDW vs AUSW 1st ODI :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतासाठी आणखी (INDW vs AUSW 1st ODI) एक वाईट बातमी आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतावर दणदणीत (Team India) विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिटफिल्ड हीने शानदार फलंदाजी केली. तिला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेट राखून सामन जिंकला. 46.3 ओव्हर्समध्येच ऑस्ट्रेलियाने हा सामना आपल्या नावे केला.

IND vs SA Test : डीन एल्गरचे दमदार शतक, यजमान संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा आणि एलिस पेरी यांनी अर्धशतकं केली. एलिस पेरी आणि फोबी लिचफिल्ड या दोघींनी शतकी भागीदारी केली. त्यांची भागीदारी तोडण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. बराच वेळानंतर यश मिळाले पण संघाचा विजय काही सोपा झाला नाही.

या सामन्यात टीम इंडियाने 8 गडी गमावत 282 धावा केल्या होत्या. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. या खेळीत तिने 7 चौकार मारले. यास्तिका भाटिया (49), रिचा घोष (21), आणि दिप्ती शर्माने 21 धावा केल्या. दरम्यान, कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत मात्र संघाने जोरदार कमबॅक केले आहे. यानंतर दुसरा एकदिवसीय सामना जिंकून आघाडी आणखी वाढविण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा राहिल. तर दुसरीकडे दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल.

IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

follow us

वेब स्टोरीज