Download App

कसोटी क्रिकेटमध्ये महिला संघाने रचला इतिहास, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी

INDW vs ENGW : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी (INDW vs ENGW) सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या विजयाची हिरो ठरलेल्या दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने या सामन्यात 9 विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताने इंग्लंडला 478 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 131 धावांवर गारद झाला. एकमेव कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने इंग्लंडच्या सर्व 10 विकेट्स घेत सामना जिंकला.

या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 428 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभा सतीशने 69, रॉड्रिग्जने 68 धावा, यास्तिका भाटियाने 66 आणि दीप्ती शर्माने 67 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 136 धावाच करू शकला. भारताकडून पहिल्या डावात दीप्ती शर्माने 5.3 षटकात 5 धावा देत 5 विकेट घेतल्या. पहिल्या डावात भारताने इंग्लंडवर 292 धावांची मोठी आघाडी घेतली होती.

भारताला इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती, पण संघाने तसे केले नाही. यानंतर टीम इंडियाने आपला दुसरा डाव 6 गडी गमावून 188 धावांवर घोषित केला. तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला हा सामना जिंकून इतिहास रचायचा होता, पण इंग्लंडला तसे करता आले नाही.

Box Office: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 15व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी करत पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 27.3 षटकात केवळ 131 धावाच करू शकला. भारताकडून दीप्ती शर्माने 4 आणि पूजा वस्त्राकरने दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या.

महिला कसोटी क्रिकेटमध्ये 300 हून अधिक धावांचा विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता, त्यांनी 1998 मध्ये पाकिस्तानचा 309 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा हा पहिलाच कसोटी विजय आहे.

Ratan Tata : टाटांना धमकावणारा ‘MBA’ पण, ‘स्किझोफ्रेनिया’ ग्रस्त; पोलिसांसमोर आली वेगळीच स्टोरी

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पहिल्या डावात 428 धावा केल्या होत्या आणि कसोटी इतिहासातील पहिल्या डावातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे, तर कसोटीच्या पहिल्या डावातील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात, भारताने पहिल्या डावात 4.09 च्या धावगतीने धावा केल्या आणि महिला कसोटीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखादा संघ 4.09 पेक्षा जास्त धावगतीने धावा करण्यात यशस्वी झाला.

Tags

follow us