Download App

IPL 2023 : सलामीचा सामना गमावलेल्या संघाने जिंकलंय दोनदा जेतेपद; काय सांगतात आकडे

  • Written By: Last Updated:

IPL 2023 CSK vs GT : क्रिकेट प्रेमींसाठी आजपासून दिवाळी सुरू होणार असून, IPL 2023 च्या 16 व्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलमध्ये चार वेळचा चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या वेळचा विजेता गुजरात टायटन्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी एक रंजक आकडेवारी आम्ही तुम्हला सांगणार आहोत. कारण आयपीएलच्या 15 सीझनमध्ये तोच संघ दोनदा चॅम्पियन बनला आहे, ज्याने आयपीएलचा पहिला सामना गमावला आहे.

Pune Loksabha : काँग्रेसकडून निवडणूक घोषणेपुर्वीच दावेदारी, पुण्यात भाजपचं टेन्शन वाढलं

आयपीएल 2008 ते 2022 पर्यंत, म्हणजेच या लीगच्या 15 सीझनमध्ये 5 वेळा असे घडले आहे, जेव्हा फक्त आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात भिडलेल्या संघालाच विजेतेपद मिळाले आहे. चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांना दिलासा देणारा हा आकडा आहे. या आकडेवारीनुसार, हे दोन संघ आयपीएल 2023 चे चॅम्पियन बनण्याची शक्यता 33% आहे.

आमची सभा होऊ नये म्हणून दंगलींचे कारस्थान, सरकारने दिला नपुंसकतेचा पुरावा; राऊतांचा घणाघात

आयपीएलचा सलामीचा सामना जिंकून विजेतेपद पटकावणारे संघ

आयपीएल 2011, 2014 आणि 2018 मध्ये हे घडले आहे. जेव्हा सलामीचा सामना जिंकणाऱ्या संघाने आयपीएलचा अंतिम सामनाही जिंकला होता. IPL 2011 मध्ये, CSK ने KKR चा 2 धावांनी पराभव केला आणि नंतर अंतिम सामन्यात RCB चा पराभव करून ट्रॉफी जिंकली. IPL 2014 च्या पहिल्या सामन्यात KKR ने मुंबईचा 41 धावांनी पराभव केला होता. नंतर केकेआरचा संघ अंतिम फेरीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करून चॅम्पियन बनला. त्याचप्रमाणे, आयपीएल 2018 च्या सुरुवातीच्या सामन्यात, CSK ने मुंबई इंडियन्सचा एक गडी राखून पराभव केला आणि त्या हंगामाच्या अंतिम सामन्यात SRH चा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

IPL 2023 : पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनसाठी ‘हे’ खेळाडू आहेत उत्सुक

सलामीच्या सामन्यात पराभूत होऊन जेतेपद पटकावणारे संघ

2015 च्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला केकेआरकडून 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. पुढे मुंबईने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आणि सीएसकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे आयपीएल 2020 मध्येही मुंबई इंडियन्सचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला होता. CSK ने मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव केला. त्या मोसमाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आजच्या सलामीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जाणारा संघ यावर्षीची ट्रॉफी पटकावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us