Download App

IPL 2023 : पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनसाठी ‘हे’ खेळाडू आहेत उत्सुक

IPL 2023 First Match :  आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याअगोदर भव्य अशी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती आहे.

या सामन्यामध्ये कोण-कोणते दिग्गज खेळाडू असणार याविषयी अंदाज वर्तवले जात आहेत. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. यंदाचा वर्षी चेन्नई आपला परफॉर्मन्स सुधारण्याचा प्रयत्न करेल. याचे कारण चेन्नईची टीम मागच्या वर्षीच्या सीजनमध्ये अत्यंत खराब फॉर्ममध्ये होती. चेन्नईच्या टीमला 14 पैकी केवळ 4 सामने जिंकण्यात यश आले होते. तेच गुजरातच्या टीमने 14 पैकी 10 सामने जिंकले होते.

चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर होणार? महत्वाची माहिती आली समोर

मागच्यावर्षी आयपीएलसाठी मिनी ऑक्शन झाले होते. तेव्हा चेन्नईच्या टीमने 16.25 कोटी रुपये खर्च करुन बेन स्टोक्सला विकत घेतले होते. तर चेन्नईच्या संघाने न्यूझीलंडचा खेळाडू काइल जेमिसनला 1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. गुजरातच्या संघाने देखील अनेक दिग्गज खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. त्यांनी केन विलियमसनला 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यासह शिवम मावीला 6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

PHOTOS : पंतप्रधान मोदींची नव्या संसदेला भेट; कशी असणार रचना

गुजरातकडून यांना मिळू शकते संधी

गुजरात टायटन्सच्या संघाकडे शुभमन गिल सारखा तरुण व आक्रमक फलंदाज आहे. त्याला ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेडची चांगली साथ मिळू शकते. तिसऱ्या क्रमांकावर केन विलियमनस खेळायला येऊ शकतो. यानंतर हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया अशी फिनिशरची टीम आहे. तर गोलंदाजीमध्ये राशिद खान, शिवम मावी, साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल हे खेळाडू आहेत.

चेन्नईकडून यांना संधी मिळू शकते

चेन्नईच्या संघाकडे मराठमोळा ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांची आक्रमक ओपनिंग जोडी आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मोईन अली येऊ शकतो तर चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडू खेळू शकतो. बेन स्टोक्सचे देखील प्लेइंग इलेवनमध्ये खेळणे निश्तित मानले जात आहे. गोलंदाजीमध्ये रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, महीश तीक्ष्णा यांच्यावर जबाबदारी आहे.

Tags

follow us