चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर होणार? महत्वाची माहिती आली समोर

  • Written By: Published:
चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर होणार? महत्वाची माहिती आली समोर

अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरात टायटन्स आणि करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीमुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत.

41 वर्षीय एमएस धोनीच्या चेन्नईमध्ये सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. गुरुवारी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करताना त्याने फलंदाजी केली नाही. याबाबत सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांना विचारले असता ते म्हणाले की, कर्णधार 100 टक्के खेळेल. मला इतर कोणत्याही घडामोडींची माहिती नाही.

पंड्याने धोनीला आपला गुरू अनेकदा सांगितले आहे आणि त्याला पुन्हा एकदा धोनीचा सामना करायला आवडेल. गेल्या मोसमात शिष्य पांड्याच्या संघाने गुरु धोनीच्या संघाला दोनदा पराभूत करण्यात यश मिळविले होते.

शुभमन गिल त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे आणि रशीद खान देखील आपल्या खेळात सातत्य दाखवत आहे. पांड्याने स्वत: त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे आणि गेल्या आयपीएलमध्ये दुखापतीतून परतल्यानंतर तो बॉल आणि बॅटने प्रभावी कामगिरी करत आहे.

Ajit Pawar : सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेणाऱ्यांचा खरा चेहरा आला समोर… 

या सामन्यात संघाला अनुभवी डेव्हिड मिलरची उणीव भासणार आहे, मात्र राहुल तेवतियाने गेल्या काही काळापासून फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. ही पोकळी भरून काढण्याचा तो प्रयत्न करेल. न्यूझीलंडचा अनुभवी केन विल्यमसनही संघात आहे. या फॉरमॅटमध्ये तो फारसा धोकादायक मानला जात नसला तरी कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्ये तो संघाचा समस्यानिवारक ठरू शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube