Ajit Pawar : सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेणाऱ्यांचा खरा चेहरा आला समोर…
Ajit Pawar on Farmer Melava : आधी म्हणायचे सरकार पाडण्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. पण मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच खुलासा केला होता. देवेंद्रजी रात्री वेश बदलून सरकार पाडण्यासाठी जायचे, असे सांगितले. तर काल या सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतःच सोलापूर येथील जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी आम्ही भाजपबरोबर दीडशे बैठका घेतल्याचे सांगितले. आता यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर केला.
आज परदेशात साखर क्विंटलला ४००० रुपये भाव आहे. आपल्याकडे ३२००-३३०० रुपये भाव आहे. आपल्याकडे दर वाढवत आहे. आम्ही म्हटलो की साखर निर्यात करायला परवानगी द्या. मात्र, ही परवानगी देत नाही. हे सर्वसामान्यांचे नाहीतर मुठभरांचे सरकार आहे. यांना शेतकऱ्यांचे काही पडलेले नाही. केवळ गतिमान सरकार म्हणून जाहिरात बाजी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटले आहे. असलं दळभद्री सरकार कधीही राज्याने पाहिले नाही. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १३ कोटी जनतेला उत्तरं द्यायला नको का, असा सवाल उपस्थित केला.
Ajit Pawar : पिकविम्यात सरकारने २००-४०० रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली! – Letsupp
राज्यात छत्रपती संभाजीनगर येथे राम नवमीच्या पूर्वसंध्येला दंगल, जाळपोळ होते. मग पोलीस काय करत होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहे. त्यांचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना फक्त खोके बहाद्दर आमदार सांभाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यांना राज्यातील १३ कोटी जनतेच्या प्रश्न, समस्याबाबत काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप अजित पवार यांनी राज्य सरकारवर केला.
(245) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube