IPL 2023 Playoffs Race : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये 74 पैकी 43 सामने झाले आहेत, परंतु आतापर्यंत हे निश्चितपणे सांगता येत नाही की कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल. टॉप-6 संघांमध्ये, गुजरात टायटन्स वगळता, सर्वांचे 10-10 गुण आहेत, त्यांचे स्थान निव्वळ रनरेटच्या आधारावर निश्चित केले जात आहे.
गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 6 विजय मिळवले आहेत, तर केवळ 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना 12 गुण आहेत. ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांचा रन रेट +0.638 आहे.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभूत झाले आहेत. त्यांना 10 गुण आहेत. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा रन रेट +0.800 आहे.
भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभूत झाले आहेत. त्यांना 10 गुण आहेत. गुणतालिकेत ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट +0.639 आहे.
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभूत झाले आहेत. त्यांना 10 गुण आहेत. गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट +0.329 आहे.
उद्धव ठाकरे दुतोंडी साप की गांडूळ? रामदास कदमांचा सवाल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभूत झाले आहेत. त्यांना 10 गुण आहेत. गुणतालिकेत ते पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट -0.030 आहे.
पंजाब किंग्स: शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत, तर 4 मध्ये पराभूत झाले आहे. त्यांना 10 गुण आहेत. गुणतालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट -0.447 आहे.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले आहेत. त्यांना 8 गुण आहेत. गुणतालिकेत ते सातव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट -0.502 आहे.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली
कोलकाता नाईट रायडर्स: नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यातील 3 जिंकले आहेत, तर 6 सामने गमावले आहेत. त्यांना 6 गुण आहेत. गुणतालिकेत ते आठव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट -0.147 आहे.
सनरायझर्स हैदराबाद: एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यातील 3 जिंकले आहेत, तर 5 सामने हरले आहेत. त्यांना 6 गुण आहेत. गुणतालिकेत ते नवव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट -0.577 आहे.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यातील त्यांना केवळ 2 सामने जिंकता आले आहेत, तर 6 मध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यांच्याकडे फक्त 4 अंक आहेत. गुणतालिकेत ते शेवटच्या म्हणजे 10व्या क्रमांकावर आहे. त्यांचा निव्वळ रनरेट -0.898 आहे.