IPL 2025 : आयपीएल २२ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत गेल्या तीन हंगामांप्रमाणेच यंदाच्या हंगामातही १० संघ खेळताना दिसणार आहेत. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी नऊ संघांच्या कर्णधारावर शिक्कामोर्तब झाले आहे. (IPL) पण स्पर्धेला १० दिवसच शिल्लक असतानाही दिल्ली कॅपिटल्सने कर्णधाराची घोषणा केली नव्हती. पण अखेर गुरुवारी (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
दिल्लीने अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये अक्षर दिल्लीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएल २०१९ पासून दिल्ली संघाचा भाग राहिला आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात योगदान दिले आहे. अक्षर पटेलने आयपीएलमध्ये १५० सामने खेळले असून १६५३ धावा केल्या आहेत. तसेच १२३ विकेट्स त्याने घेतल्या आहेत. अक्षरने दिल्लीकडून ८२ सामन्यात ९६७ धावा केल्या आहेत आणि ६२ विकेट्स घेतल्या आहेत.
ICC T20I Ranking : टॉप-10 मध्ये यशस्वी जैस्वाल; अक्षर पटेलचीही;गरुडझेप
दरम्यान, काही मिडिया रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्स केएल राहुलचा देखील कर्णधारपदासाठी विचार करत होते. परंतु, त्याने कर्णधारपदाची ऑफर नाकारली. त्यामुळे दिल्लीने अक्षर पटेलकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
दिल्लीने यंदा अनेक बदल केले आहेत. त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्येही बदल झाला आहे. दिल्ली संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी हेमांग बदानी यांची नियुक्ती झाली असून सहाय्यक प्रशिक्षक मॅथ्यू मॉट, गोलंदाजी प्रशिक्षक गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक वेनुगोपाल राव आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ४४ वर्षीय केविन पीटरसनची दिल्ली कॅपिटल्सने मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे.
आयपीएल २०२५ साठी सर्व कर्णधार
मुंबई इंडियन्स – हार्दिक पांड्या
चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड
सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- रजत पाटीदार
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे
पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
लखनौ सुपर जायंट्स – रिषभ पंत
गुजरात टायटन्स – शुभमन गिल
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल