IPL 2025 Kuldeep Yadav Slaps Rinku Singh : आयपीएल 2025 ( IPL 2025) मध्ये 29 एप्रिल रोजी केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होता. या सामन्याचा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) दोनदा कानशिलात मारताना दिसत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये कुलदीप, रिंकू आणि इतर काही खेळाडू बोलत आणि विनोद करताना दिसत आहेत. मग अचानक कुलदीपने गंमतीने रिंकूला कानशिलात लगावली. पण रिंकूला ते आवडले नाही. तो थोडासा गोंधळलेला (Delhi Capitals Vs KKR) दिसत होता. यानंतर कुलदीपने त्याला पुन्हा मारलं. त्यावेळी मात्र रिंकू चिडलेला दिसतोय. तसेच तो रागाच्या भरात कुलदीप यादवला काहीतरी बोलताना देखील दिसत आहे.
Kuldeep slapping Rinku😭😭 @imkuldeep18 @rinkusingh235 #IPL #KuldeepYadav #RinkuSingh #DCvKKR pic.twitter.com/vL0WJ0Ld8h
— DM (@DM_20_12) April 29, 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार; मोठी अपडेट आली समोर
या व्हिडिओ क्लिपमध्ये कोणताही ऑडिओ (Cricket News) नाही, त्यामुळे कुलदीपच्या कृतीमागील कारण कळू शकलेले नाही. पण सोशल मीडियावर चाहत्यांनी कुलदीपच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सॅम्युअल नावाच्या एका चाहत्याने लिहिले की, हे खूप दुःखद आहे. रिंकु सिंगला खूप वाईट वाटले. अशा प्रकारच्या वर्तनासाठी कुलदीपला स्पर्धेतून काढून टाकले पाहिजे. रिंकूच्या चेहऱ्यावरचा बदल तुम्हाला दिसतोय. त्याच्या वेदना मी जाणवू शकतो. हे खूप दुःखद… खूप दुःखद आहे. आता याला विनोद म्हणणं थांबवा, अशी कमेंट चाहत्याने केली आहे.
तुम्हीही खाताय व्हायरल दुबई चॉकलेट? निर्माण होऊ शकतो लिव्हर डॅमेज ते कॅन्सरपर्यंतचा धोका
दिल्ली कॅपिटल्स घरच्याच मैदानावर हरले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 9 गडी गमावून 204 धावा केल्या. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघ 20 षटकांत फक्त 190 धावाच करू शकला. हा सामना 14 धावांनी हरला. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना आता 5 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे.