Kuldeep Yadav : कुलदीपनं केली कमाल! ‘या’ खास रेकॉर्डमुळे ठरला टीम इंडियाचा पहिला गोलंदाज

Kuldeep Yadav : कुलदीपनं केली कमाल! ‘या’ खास रेकॉर्डमुळे ठरला टीम इंडियाचा पहिला गोलंदाज

Kuldeep Yadav IND vs ENG Test Match Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि (IND vs ENG) अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. फिरकीपटू कुलदीप यादवने  (Kuldeep Yadav) तर जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच दिवशी पाच विकेट्स देत इंग्लंडच्या फलंदाजांनी मैदानात फार काळ टिकू दिले नाही. या दरम्यान कुलदीप हा भारताकडून (Team India) सर्वात कमी चेंडूत 50 कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने 1871 चेंडूत 50 विकेट्स घेतल्या. त्याच्यानंतर अक्षर पटेल (2205 चेंडू) आणि जसप्रित बुमराह (2520) यांचा नंबर आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटच्या इतिहासात कुलदीप हा पहिलाच असा गोलंदाज ठरला आहे ज्याने दोन हजारांपेक्षा कमी चेंडूत 50 विकेट्स घेतल्या आहेत.

Ind vs Eng : भारताचा इंग्लंडवर 434 धावांनी दणदणीत विजय; जैस्वाल, रवींद्र जडेजा ठरले ‘हिरो’

पाचव्या सामन्यात  इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् चांगली सुरुवात केली. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin)अप्रतिम गोलंदाजीपुढं इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घेतलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावांवर बाद झाला आहे.

इंग्लंड टीमचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes)नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal)भारताकडून पदार्पण केले. देवदत्त हा भारताकडून कसोटी खेळणारा 314 वा खेळाडू ठरला. रविचंद्रन अश्विन भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा 14 वा आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) इंग्लंडकडून 100 कसोटी खेळणारा 17 वा खेळाडू ठरला.

कुलदीप यादव टीम इंडियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने 5 फलंदाजांना बाद केलं. त्याचबरोबर रवीचंद्रन अश्विनने आपल्या 100 व्या कसोटीत 4 बळी घेतले. रवींद्र जडेजाला 1 यश मिळालं. कर्णधार बेन स्टोक्ससह इंग्लंडचे तीन फलंदाज एकही धाव न काढता बाद झाले. त्यामुळे एकेकाळी भक्कम स्थितीत दिसणारा इंग्लंडचा संघ अवघ्या 218 धावांत सर्वबाद झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज