डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार; मोठी अपडेट आली समोर

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार; मोठी अपडेट आली समोर

Dr. Shirish Valsangkar Suicide Case : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली (Suicide)  आत्महत्या नोट ही पोलिसांच्या दृष्टीने मनीषा मुसळे मानेविरूद्धचा महत्त्वाचा पुरावा आहे. परंतु, डॉक्टरांच्या आत्महत्येसाठी मनीषाच कारणीभूत आहे, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अन्य पुरावे गोळा करावे करावे लागतील. इतर पुरावे न मिळाल्यास त्यांना निर्दोष सोडू शकतात. त्यासंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असल्याचं तज्ज्ञ वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

आत्महत्या नोट

स्वत:वर गोळ्या झाडलेल्या डॉ. शिरीष यांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर उपचारावेळी त्यांच्या अंगावरील कपडे फाडून काढले फाडण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाल्यावर पोलिसांनी डॉक्टरांचे कपडे ताब्यात घेतले होते. दुसऱ्या दिवशी पडताळणीवेळी पॅन्टमध्ये आत्महत्या नोट मिळाल्याची नवी माहिती पोलिसांनी दिली. पण, डॉ. अश्विन यांच्या फिर्यादीनुसार आत्महत्येच्या दिवशी डॉ. शिरीष वळसंगकर, त्यांची पत्नी डॉ. उमा व मुलगा डॉ. अश्विन यांच्यासमोर मनीषानी ‘ई-मेल’बद्दल माफी मागितली आणि माफीनामा लिहून दिला.

आत्महत्येच्या अर्धा तास आधी चौघांना फोन, दिवसभरात 27 कॉल्स; डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी मोठं अपडेट

ई-मेलची मूळ प्रत देखील रुग्णालयात फाडून टाकल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ई-मेलमुळे डॉ. शिरीष आत्महत्या कसे करतील, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी सुरवातीला मनीषाची तीन दिवसांची पोलिस कोठडी घेतली. त्यानंतर दोन दिवसांची वाढीव कोठडीही घेतली. मात्र, त्यांच्याकडं तपास करून काही निष्पन्न होणार नाही म्हणून पोलिसांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली. ९ मे ला कोठडीची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी, पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्यास मनीषाला जामीन मिळू शकतो, असं तज्ज्ञ वकील सांगत आहेत.

सरकारी पक्षाचं म्हणणं

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी मागितलेली न्यायालयीन कोठडी ९ मे रोजी संपणार आहे. दरम्यान, मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून न्यायालयाने त्यावर ९ मे पर्यंत म्हणणे सादर करायला सांगितले आहे. पोलिसांनी मनीषाच्या पोलीस कोठडीचे हक्क राखून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्यातील पाच दिवस संपले असून अजूनपर्यंत पोलिसांनी मनीषाच्या कोठडीची मागणी केलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube