IPL 2026 Auction : भारतीय खेळाडूंना धक्का, पृथ्वी शॉ पाठोपाठ सरफराज खान देखील अनसोल्ड

IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठी अबू धाबी येथे आज मिनी लिलाव सुरु झाला असून या लिलावात 369 खेळाडूंसाठी दहा संघ बोली लावत आहे.

IPL 2026

IPL 2026

IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठी अबू धाबी येथे आज मिनी लिलाव सुरु झाला असून या लिलावात 369 खेळाडूंसाठी दहा संघ बोली लावत आहे. मात्र या लिलावाच्या सुरुवातीला भारतीय खेळाडूंना मोठा धक्का लागला आहे. भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ आणि सरफारज खान या लिलावात सुरुवातीला अनसोल्ड राहीले आहे.

या दोन्ही खेळाडूंवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तर दुसरीकडे केकेआरने (KKR) ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला (Cameron Green) 25.20 कोटीमध्ये खरेदी केले आहे. कॅमेरॉन ग्रीन आता आयपीएलच्या इतिहासातील (IPL 2026 Auction) सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला आहे. तर दुसरीकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरीनंतर देखील सरफराज खान आणि पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) बोली लावण्यात कोणत्याही संघाने रस दाखवले नाही.

सरफराज खानला (Sarfaraz Khan) आयपीएल 2025 मध्ये देखील कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. तर आयपीएल 2026 साठी होणाऱ्या मिनी लिलावात भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ वर मोठी लावली लागणार अशी अपेक्षा होती मात्र त्याला पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तर जॅक फ्रेझरला पहिली बोली मिळाली, परंतु कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. डेव्हिड मिलरला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटीच्या बेस प्राईसवर खरेदी केले.

Meesho IPO चा चमत्कार, सह-संस्थापक विदित अत्रे अब्जाधीश; कमावले हजारो कोटी रुपये

Exit mobile version