Hardik Pandya’s Gujarat return stalled over captaincy : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 साठी ट्रेड लिस्ट जाहीर होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सध्या पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकला पुढील हंगामात संघात कायम ठेवले जाणार की त्याचा ट्रेड होणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
इम्रान खान कदाचित जिवंत नसतील? पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा
2024 मध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले आणि रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे IPL 2027 पूर्वी हार्दिकला ट्रेड केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांना त्याच्यात रस असल्याची चर्चा आहे.
गुजरात टायटन्समध्ये परतण्याचा प्रयत्न?
या सगळ्या चर्चांमध्ये आता हार्दिकच्या गुजरात टायटन्समधील संभाव्य पुनरागमनाची माहिती समोर आली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, हार्दिकने गुजरात टायटन्सच्या व्यवस्थापनाशी पुन्हा संघात जाण्याबाबत चर्चा केली होती. विशेष म्हणजे, गुजरातचा सध्याचा कर्णधार शुभमन गिल यानेही हार्दिकच्या पुनरागमनाला कथितरित्या हिरवा कंदील दिला होता.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; दुखापतीमुळे दोन स्टार खेळाडू बाहेर
मात्र, हा संभाव्य ट्रेड एका महत्त्वाच्या मुद्द्यावर अडकला. हार्दिकने गुजरातमध्ये परतण्यासाठी कर्णधारपदाची अट ठेवल्याचे वृत्त आहे. फ्रँचायझीने ही अट मान्य करण्यास नकार दिल्याने अखेर हा व्यवहार होऊ शकला नाही.
दरम्यान, गुजरात टायटन्सच्या प्रतिनिधीशी याबाबत संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हार्दिकच्या व्यवस्थापकाने मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. हार्दिकने कोणत्याही फ्रँचायझीसोबत ट्रेड किंवा ट्रान्सफरबाबत थेट चर्चा केलेली नाही. त्याच्याशी संपर्क साधला गेला असल्यास तो केवळ मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून झाला असल्याचे व्यवस्थापकाने स्पष्ट केले.
गुजरातला बनवलं होतं आयपीएल चॅम्पियन
हार्दिक पांड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्ससोबत केली. 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये दाखल झाला आणि पहिल्याच हंगामात त्याने संघाचे नेतृत्व करत गुजरातला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. पुढील हंगामातही हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर 2024 मध्ये ट्रेडद्वारे हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला. मुंबईने त्याच्याकडे रोहित शर्माच्या जागी संघाचे नेतृत्व सोपवले.
मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आणि संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर आणि संघातील भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
‘वंदे मातरम’वर आक्षेप घेणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही’
आता हार्दिकच्या ट्रेडसाठी अनेक संघ इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, IPL 2027 साठी त्याचा कोणत्या संघात समावेश होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
